Kunbi Records Now Available Online 
महाराष्ट्र

Kunbi Nondi : कुणबी नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर; ग्रामपंचायत फलकावर याद्या लावण्याचे उपसमितीचे आदेश

Kunbi Records Now Available Online : मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५,११३ मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

डॉ. माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी

Maratha Reservation Update: जिल्ह्यात आढळलेल्या 'मराठा-कुणबी' व 'कुणबी-मराठा' नोंदींची माहिती जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करून ही माहिती नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्या-त्या गावातील याद्या प्रदर्शित कराव्यात, असे आदेश मराठा आरक्षण उपसमितीने दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 'मराठा', 'मराठा-कुणबी' आणि 'कुणबी-मराठा' अशा जातींच्या नोंदी जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळल्या आहेत. जिल्ह्यात अशा नोंदींची संख्या ५,११३ इतकी आहे. या सर्व नोंदी व संबंधित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना या याद्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी ऑनलाइन बैठकीत दिले.

Kunbi Records Now Available Online

प्रमाणपत्रांसाठी शिंदे समितीचा मराठवाडा दौरा

पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा सुरू होत आहे. समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका होणार असून, त्यात कामकाजाचा आढावा घेतला जाईल. आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथे; ९ सप्टेंबरला नांदेड व लातूर येथे, तर १० सप्टेंबरला धाराशिव आणि बीड येथे बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

एकाच झटक्यात काढले ४ महत्त्वाचे GR

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती आणि सुविधा लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित 'डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्या'साठी सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

सारथीमार्फत परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी आता थेट संबंधित संस्थांना दिली जाईल (ज्यामुळे मर्यादेची अट रद्द झाली आहे). तसेच विद्यार्थ्यांना दरवर्षी १५०० यूएस डॉलर (UK साठी ११०० GBP) अतिरिक्त निर्वाह भत्ता मंजूर करण्यात आला आहे.

'सारथी' संस्थेमार्फत १,४४० मराठा व कुणबी तरुणांना मोफत LMV/HMV ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षणार्थींपैकी किमान १,००० जणांना रोजगार मिळवून देणे बंधनकारक असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

Dogs crying at night: कुत्रे अचानक रात्रीच्या वेळेसच का रडतात?

Maharashtra : महाराष्ट्रातील 'ही' ५ शहरे सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध, इथे फिरला नाहीत तर काय मजा!

Heart stent blockage: रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकल्यानंतरही पुन्हा ब्लॉकेजचा धोका; डॉक्टरांनी सांगितलेली कारणं ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Cabinet Reshuffle : कोणाचा पत्ता कटणार, कोणाला बढती मिळणार? PM मोदींच्या ३ तासांच्या बैठकीने दिल्लीतील राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT