Kunal Saam
महाराष्ट्र

Kunal Kamra: भरमसाठ शिव्या, थेट आव्हान; शिवसैनिक आणि कुणाल कामराचा संभाषणाचा ऑडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

Stand-up comedian Kunal Kamras Song: संतापलेल्या शिवसैनिकाने कुणाल कामराला धमकीचा केला. फोन करून त्याला 'जिथे भेटशील तिथे तुला मारू' अशी धमकी दिली. सध्या या धमकीचा ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वादग्रस्त गाणं तयार केलं. ज्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातील टिप्पणीमुळे शिवसैनिक तसेच सत्ताधारी नेते आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोडही केली. तसेच कामराच्या मुसक्या आवळून त्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली.

संतापलेल्या शिवसैनिकाने कामराला धमकीचा केला. फोन करून त्याला 'जिथे भेटशील तिथे तुला मारू' अशी धमकी दिली. सध्या या धमकीचा ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

जबिर नावाच्या शिवसेना शाखा प्रमुखाने कामराला कॉल केला. त्यात जबिरने शिंदेबद्दल विडंबनात्मक गाण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर कामराने 'तुम्ही पाहिला ना व्हिडिओ', असे प्रतिउत्तर देतो. त्यावर शिवसैनिकाने, 'क्लबची जशी तोडफोड केली, तसेच तुझे हाल करू; जिथे भेटशील तिथे तुला मारू', अशी धमकी दिली आहे.

त्यावर कुणाल 'मी तामिळनाडूमध्ये आहे, इथेच मी राहतो', असं जबिरला उत्तर दिलं. तेव्हा जबिरने, 'तु कुठे राहतोस?' असा प्रश्न विचारला. त्यावर 'मी तामिळनाडूमध्ये राहतो' असं उत्तर कामरने उत्तर दिलं. त्यावर 'तुला तामिळनाडूमध्ये येऊन मारेन', असं जबिर कुणालला धमकावून सांगतो.

मी सुपारी घेतलेली नाही, मी माफी मागणार नाही..

या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केली. त्याने फोनवर, मी सुपारी घेतलेली नाही. हवं तर बँक खाती तपासा, असं कुणाल कामरा म्हणाला आहे. तसेच वक्तव्य मागे घेणार नसल्याचंही कामराने पोलिसांनी सांगितलं. कोर्टाने सांगितल्यावर माफी मागेन असंही कुणाल म्हटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT