sahitya akademi award for krushnat khot ringan  saam tv
महाराष्ट्र

Sahitya Akademi Award 2023: कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार यंदा (sahitya akademi award 2023) कोल्हापुरातील कृष्णात खोत (krushnat khot) यांच्या 'रिंगाण' (ringan) या कांदबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील 'रिंगाण' चा समावेश झाला आहे. एक लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. (Maharashtra News)

काेल्हापूरातील कृष्णात खोत यांनी रिंगाण या कादंबरीचे लेखन केले आहे. त्यांनी या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.

कृष्णात खोत यांच्या रिंगाणला पुरस्कार मिळाल्याने काेल्हापुरातील लेखकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. खाेत यांच्यावर समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. एक लाख रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT