nashik  Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची एन्ट्री; भर दिवसा एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात खळबळ

Nashik News update : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगची एन्ट्री मारली आहे. नाशिकमध्ये भर दिवसा एकावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नाशिक : पुण्यात कोयता गँगने हैदोस घातला आहे. पुण्यानंतर आता नाशिकमध्येही कोयता गँगची एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये कोयता गँगने एकावर जीवघेणा हल्ला केला आहे. भरदिवसा सात ते आठ जणांनी हातात कोयता घेऊन हल्ला केला आहे. कोयता गँगच्या हल्ल्यानंतर परिसरात नागरिक भयभीत झाले आहेत .

नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात भर दिवसा टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने कोयता आणि चॉपरने युवकावर हल्ला केला आहे. भरदिवसा सात ते आठ जणांनी एकावर हातात कोयता घेऊन हल्ला केला आहे.

अंबड पोलिसांत गुन्हा नोंद

या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच हल्ल्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी कोयता गँगमधील घटनास्थळावरील दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

येरवड्यात पुन्हा कोयता गँगची दहशत

पुण्यातील येरवडा लक्ष्मीनगर येथील महापालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी पोकलँड मशीनचा वापर केला जात आहे. दोन पोकलेन मशीनच्या काचा अज्ञातांनी फोडून दहशत निर्माण केली आहे. याबाबतची तक्रार महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत फडतरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतरही वारंवार असे प्रकार होऊ लागल्याने असताना रहिवाशी भयभयीत झाले आहेत.

आता महापालिकेच्या ठेकेदाराच्या कामगारांना तलवार लावून धमकावणे, पोकलेन मशीन फोडणे असे प्रकार घडत असल्याने विकास कामे कशी होणार असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनमाड पोट निवडणुकीत शिवसेना विजयी, समर्थकांचा जल्लोष

धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT