Konkan Railway Saam TV
महाराष्ट्र

Konkan Railway disrupted : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्यात रेल्वे स्थानकांत थांबल्या

Heavy Rain in Sindhudurg : कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच गाड्या सध्या उशिराने धावत असून तब्बल ६ ते ७ तास उशिराने धावत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठीकाणी ट्रकवर पाणी जमा झालं आहे.

त्यामुळे सावंतवाडी, ओरोस, कणकवली, नांदगाव या ठिकाणी कोकण रेल्वेच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कोकण रेल्वेमार्गावरील सर्वच गाड्या सध्या उशिराने धावत असून तब्बल ६ ते ७ तास उशिराने धावत आहेत. ( Rain News)

अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या

डाऊन मार्ग

1) मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस (कुडाळमध्ये थांबली आहे)

2) मडगांव तेजस एक्सप्रेस (सिंधुदुर्गमध्ये थांबली आहे)

3) मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (कणकवलीमध्ये थांबली आहे)

4) केरळ संपर्क क्रांति एक्सप्रेस (नांदगावमध्ये थांबली आहे)

5) दिवा (राजापूरमध्ये थांबली आहे)

6) मांडवी एक्सप्रेस (वैभववाडी येथे थांबली आहे.) (Maharashtra News)

अप मार्ग

1) करमली - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित सुपरफास्ट एक्सप्रेस (झाराप येथे थांबली आहे)

2) कोच्चुवेली - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस (कारवार येथे थांबली आहे)

3) तुतारी एक्सप्रेस (सावंतवाडी येथे थांबली आहे)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

SCROLL FOR NEXT