Konkan Railway's Car RoRo train at Roha station—making Ganesh festival travel to Konkan smooth and traffic-free. Saam tv
महाराष्ट्र

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Konkan Railway Launches Car Roro Service: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी कोकण रेल्वेने कार रोरो सेवा सुरू केलीय. रोहा ते गोवा ही सेवा उपलब्ध असणार आहे.

Bharat Jadhav

  • कोकण रेल्वेने पहिल्यांदाच गणेश भक्तांसाठी रोरो सेवा सुरू केली आहे.

  • कारसह कुटुंबातील ३ जण प्रवास करू शकतात.

  • ही सेवा रोहा ते गोवा वेरणा स्टेशनदरम्यान चालणार आहे.

  • २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान ही सुविधा उपलब्ध आहे.

गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्याची संख्या खूप असते. वाढत्या प्रवासी संख्येमुळे रस्त्यावर मोठी ट़्राफिक होत असते. त्यादरम्यान रेल्वेतही मोठी गर्दी असते. अनेकवेळा भाविकांना रेल्वेचं तिकीट मिळत नाही. आगामी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेनं खास सुविधा सुरू केलीय. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने कार रोरो सेवा सुरू केली आहे.

कार ट्रेनवर लोड करून कोकणात पोचविल्या जाणार आहेत. कारबरोबर परिवारातील ३ व्यक्तींना त्याच ट्रेन मधून गावाकडे जाता येणार आहे. कोकण रेल्वेने पहिल्यांदाच कार रोरो सेवा सुरू केली आहे. यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाताना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आणि खराब रस्त्यापासून गणेशभक्तांची सुटका होणार आहे.

२३ ॲागस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत ही कार रोरो सेवा सुरू असेल. रोहा येथील कोल्हाड रेल्वे स्थानकात कार ट्रेनवर चढविल्या जातील. यानंतर त्या गोवा येथील वेरणा रेल्वे स्थानकावर खाली उतरल्या जातील. सायंकाळी ५ वाजता सुटणारी ट्रेन पहाटे ५ वाजता पोचणार आहे. एका कारसाठी ७ हजार ८०० रूपये खर्च येणार आहे.

दरम्यान मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली होती. “रो-रो सेवा सुरू करण्यासाठी अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असून, गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”या सेवेमुळे मुंबईकरांना गर्दीपासून मुक्त आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल, असं नितेश राणे यांनी सांगितले होतं.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे महामार्गांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासातील वेळ यामुळे नागरिक त्रस्त होत असतात. अशावेळी जलमार्ग हा एक पर्यायी आणि सुलभ मार्ग ठरू शकतो.

कोकण रेल्वेची कार रोरो सेवा म्हणजे काय?

ही एक विशेष ट्रेन सेवा आहे जिथे तुम्ही तुमची कार ट्रेनवर लोड करून प्रवास करू शकता. कारसोबत ३ प्रवाशांना ट्रेनने प्रवासाची सुविधा मिळते.

ही सेवा कोणत्या मार्गावर उपलब्ध आहे?

रोहा येथून कोल्हाड स्थानकातून गाड्या चढविल्या जातील आणि गोवा येथील वेरणा स्थानकात उतरवल्या जातील.

सेवा कोणत्या तारखांना चालू आहे?

२३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२५ दरम्यान ही सेवा चालू राहणार आहे.

एकूण खर्च किती आहे?

एका कारसाठी ७८०० रुपये खर्च येणार आहे, यात ३ प्रवाशांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT