Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Pune Traffic News : वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत.
Pune Traffic
Pune TrafficSaam TV
Published On
Summary
  • वाघोलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रायोगिक उपाययोजना राबवण्यात आल्या.

  • वाहनचालकांना मार्गदर्शक फलक पाहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन.

  • लोहगाव व केसनंद कडे जाण्याच्या मार्गात बदल.

  • वाहतूक नियोजनासाठी वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित.

पुणे-नगर महामार्गावरील वाघोली भागात कायमस्वरूपी जाणवणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने प्रायोगिक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात आली असून, त्याचा काही अंशी परिणाम दिसून येत आहे. मात्र, या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून वाहतूक कोंडी अद्यापही पूर्णपणे सुटलेली नाही.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याच्या चौकांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, वाहनचालकांनी या फलकांकडे लक्ष देऊन त्यानुसार वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. वाघोली परिसरात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणाऱ्या या नियोजनाचा उद्देश वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचा आहे.

Pune Traffic
Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे ब्रिटीशकालीन धरण ९२ टक्के भरलं, पाणीचिंता मिटणार?

यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त हिम्मत जाधव यांनी स्वतः वाघोलीतील प्रमुख चौकांमध्ये उभे राहून परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय वाघोली वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे हे त्यांच्या पथकासह वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे हे देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मदत करत आहेत.

Pune Traffic
Pune : पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर! हिंजवडीच्या सरपंचाला झापलं | VIDEO

शनिवारी देखील या अधिकाऱ्यांनी वाघोली परिसराचा दौरा करत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी वाहतूक नियोजनात मदत करणारे स्थानिक प्रतिनिधी अनंता कटके, कल्पेश जाचक, संपत गाडे आणि तात्या आव्हाळे हे देखील उपस्थित होते. प्रशासनाकडून या उपाययोजनांमधून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Traffic
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

काय आहेत उपाययोजना?

  1. आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाण्यास बंदी.

  2. केसनंद फाटा चौकात उजवीकडे वळण्यास ( केसनंद कडे ) बंदी.

  3. केसनंद फाटा चौकापासून पुढे ३०० मीटर वर ( स्टार बजार  जवळ ) उजवीकडे (केसनंदकडे ) वळण घेता येईल.

  4. केसनंद रोड वरून नगर कडे जाणाऱ्यांसाठी केसनंद फाटा चौकातून वळण घेता येईल.

  5. आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे अथवा गावात जाण्यासाठी वाघेश्वर मंदिर चौकातून जावे लागेल.

Q

वाघोली परिसरात कोणत्या कारणामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले?

A

वाघोलीत सततची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणे वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर मार्ग बदल केले आहेत.

Q

या नव्या उपाययोजनांमध्ये कोणकोणते बदल करण्यात आले आहेत?

A

आव्हाळवाडी चौकातून लोहगाव कडे जाण्यास बंदी, केसनंद फाट्याहून उजवीकडे वळण्यास बंदी, तसेच नव्या वळणबिंदूंची आखणी करण्यात आली आहे.

Q

वाहनचालकांसाठी कोणते आवाहन करण्यात आले आहे?

A

वाहनचालकांनी दिशादर्शक फलकांचे पालन करून वाहतूक नियमानुसार मार्गक्रमण करावे.

Q

कोणते अधिकारी यावर लक्ष ठेवून आहेत?

A

अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, वाघोली वाहतूक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे आणि वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com