शिंदे गटानंतर आता भाजपने ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाला मोठा दणका दिलाय. सिंधुदुर्गात भाजपने दोन्ही पक्षात मोठं खिंडार पाडत नगरसेवकांचा पक्षात प्रवेश करून घेतलाय. कुडाळ तालुक्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
आज भाजप कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमूख उपस्थितीत ओरोस येथे पार पडला यावेळी मंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगांवकर,आदीं मान्यवर उपस्थित होते. आज पार पडलेल्या पक्ष प्रवेशात कुडाळ नगर पंचायतचे उबाठा गटाच्या नगरसेवकानी आज भाजपमध्ये प्रवेश केला तसेच काँग्रेसच्या दोन नरसेविकानीही भाजपात प्रवेश केला.
कुडाळ नगरपंचायत
उबाठा गट नगरसेवक
१) किरण शिंदे
२) उदय मांजरेकर
३)ज्योती दळवी
४)सइ कळप
५)श्रेया गावडे
काँग्रेस नगरसेवक
१)आफरीन करोल
२) अक्षता खटावकर
देवगड जाम संडे नगरपंचायत (उबाठा गट)
१)नगरसेवक बुवा तारी
२)संतोष तारी
देवगड, ओरोस,येथील सुमारे २५० उबाठा कार्यकर्तांचा भाजपत प्रवेश
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.