कोलकत्तामध्ये महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
कोलकत्तामधील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. या काळात रुग्णांची ओपीडी आणि ऑपरेशन्स होणार नाहीत मात्र, आपत्कालीन सेवा सुरू राहतील. आज सकाळी ६ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील डॉक्टर्स २४ तास संपावर जाणार असल्याची घोषणा इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असे मत व्यक्त करत मृत महिला डॉक्टरला न्याय, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा आदी मागण्या घेऊन हे आंदोलन केलं जाणार आहे. देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे. या संपकाळात बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) तसेच नियोजित शस्त्रक्रिया बंद राहणार आहे. तर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू राहणार आहेत.
कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पाळला आहे. जिल्ह्यातील सर्व दवाखाने आज पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. त्याचा रुग्ण सेवेवर परिणाम होताना दिसतो आहे. रुग्णांना उपचारासाठी केवळ शासकीय दवाखान्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत.
कोलकत्ता येथील महिला डॉक्टरसोबत केलेला प्रकार अत्याचार व खून ही अतिशय घृणास्पद व अमानुष प्रकार असून या घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये परिचारिका, डॉक्टर व युवासेनेच्या वतीने कँण्डल मार्च काढण्यात आला. धाराशिवच्या जिजाऊ चौकातून या कँण्डल मार्चला सुरूवात करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने ठाकरे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी व डॉक्टर व परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.