Sangeet surya Keshavrao Bhosle Theatre Fire 
महाराष्ट्र

Kolhpur Fire: कोल्हापुरात भीषण आग, ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक

Sangeet surya Keshavrao Bhosle Theatre Fire: संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी

कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. भीषण आगीमुळे नाट्यगृह जळून खाक झाले आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाच्या बाजूने ही आग लागलीय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक मान आहे. अनेक अजरामर नाटकांचे सादरीकरण येथे झालं आहे.

उद्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आवरून कर्मचारी घरी गेले होते. त्यावेळी आग लागल्याची घटना घडलीय. संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागलीय. भीषण आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाले आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहूकालीन पॅलेस थेटर म्हणून ओळखलं जातं. सध्याच्या संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृहाला आज सायंकाळी आग लागल्याची घटना घडलीय. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाहीये. या आगीत कुस्ती मैदानाची व्यासपीठ जळून खाक झाले आहे. संपूर्णपणे लाकडाचे असल्याने ही आगीने भडका पकडला होता. या कुस्ती मैदानाला लागूनच केशव भोसले नाट्यगृह असल्याने त्यालाही आग लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; वादळी वाऱ्याने कोसळले पोस्टर

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मच्छीमारांना मिळणार वीज सवलत, फक्त ठेवली महत्वाची अट

Maharashtra Live News Update: पनवेलमधील पळस्पेफाटा येतील दुकानाला लागली आग

खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

SCROLL FOR NEXT