Kolhapur Airport gears up for the launch of the new Mumbai flight service starting March 2. 
महाराष्ट्र

Kolhapur To Mumbai Flight: मुंबई ते कोल्हापूर प्रवास आता फक्त एक तासाचा; दिवसातून दोनवेळा विमानाचे उड्डाण, जाणून घ्या वेळापत्रक

Kolhapur Mumbai Flight: २ मार्चपासून नवीन विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोल्हापूर ते मुंबई प्रवास सोपा आणि जलद झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी उड्डाणे सुरू झाल्यामुळे, प्रवासी आता फक्त एका तासात प्रवास पूर्ण करू शकणार आहे.

Bharat Jadhav

  • २ मार्चपासून कोल्हापूर–मुंबई विमानसेवा सुरू होणार.

  • प्रवासाचा कालावधी फक्त एक तास.

  • दिवसातून दोन वेळा उड्डाणाची सुविधा.

रणजीत माजगाव, साम टीव्ही

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास तुम्ही अवघ्या एका तासात पूर्ण करू शकणार आहे. हो, अगदी बरोबर, कारण २ मार्चपासून कोल्हापूर–मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होणार आहे, आणि विमानाचे उड्डाण सकाळसोबतच सायंकाळीही होणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ही अतिरिक्त सेवा सुरू होत आहे. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोल्हापूर शहर वेगाने विकासीत होत आहे. या शहराची आणि इतर ठिकाणांशी असलेली कनेक्टिव्हिटी देखील मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. त्यामुळे विमानाच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात होती. व्यावसायिक,विद्यार्थी आणि आपत्कालीन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता सायंकाळच्या सत्रातील विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर केवळ सकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे. २ मार्चपासून दर मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता स्टार एअरवेजचे विमान मुंबईहून कोल्हापूरकडे उड्डाण करेल. हे विमान सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात दाखल होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी हे विमान कोल्हापूरहून पुन्हा मुंबईकडे उड्डाण होईल आणि सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

देशभरात ixigo ची ‘एअरपोर्ट कॅब’ सेवा सुरू

ixigo ने देशभरातील प्रमुख विमानतळांवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअरपोर्ट कॅब’ ही नवी सेवा सुरू केली आहे. वेळेवर पिक-अप आणि शेवटच्या क्षणी कॅन्सलेशन टाळण्यावर भर देत ही सेवा विमानतळ प्रवास अधिक सोपा आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

SCROLL FOR NEXT