Heart Health: फक्त जेवणाच्या ताटात या 4 पदार्थांचा करा समावेश; हार्ट अटॅकचा धोका जवळही येणार नाही

Foods for Heart Health: हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये, फॅटी फिश, बदाम आणि अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या या चार पदार्थांचे फायदे आणि संतुलित आहाराचे महत्त्व.
Heart Health
Heart Healthsaam tv
Published On: 

आजकाल कमी वयातही हार्ट अटॅकचा आणि स्ट्रोक येण्याच्या घटना समोर येतायत. त्यामुळे हृदयाची काळजी घेणं खूप गरजेचं झालंय. हृदय दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर रोजच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. हार्टशी संबंधित आजार प्रामुख्याने वाढत्या वयातील लोकांमध्ये दिसून यायचे. मात्र आता कमी वयातील लोकांनाही हार्ट अटॅकच्या समस्या दिसून येतात.

आपण रोजच्या जेवणात कोणते पदार्थ खातो याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणते ४ पदार्थ आहारात असावेत ते जाणून घेऊया.

Heart Health
Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

पालेभाज्या खा

पालक, केल आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी अशा भाज्या खाणं महत्त्वाचं आहे. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, हिरव्या पालेभाज्या हा हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात पालक, मेथी किंवा इतर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

आहारात होल व्हीटचा समावेश करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खाणं फायदेशीर ठरू शकतं. ओट्स, ब्राऊन राईस आणि संपूर्ण धान्यांपासून तयार केलेल्या ब्रेडमध्ये मैदा किंवा इतर रिफाइंड धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांच्या तुलनेत जास्त फायबर असतं. अनेक रिपोर्ट्समध्ये आहारात संपूर्ण धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

Heart Health
Blood vessel health: प्लाक जमा होऊन रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यात? या 5 ड्रिंक्सने लगेच वितळेल चरबी

फॅटी फिश

मासे खाणाऱ्यांसाठी फॅटी फिश हा आहारातील एक चांगला पर्याय आहे. सॅल्मन, सार्डिन आणि ट्राउट यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. अमेरिकन हार्ट असोसिएशननेही हृदय निरोगी ठेवण्यासाठी फॅटी फिश खाण्याला महत्त्व दिलंय.

बदाम आणि अक्रोड

बदाम, अक्रोड आणि इतर सुक्या मेव्यामधून शरीराला अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजेच आरोग्यासाठी उपयुक्त प्रकारची चरबी मिळते. त्यामुळे संतुलित आणि हृदयासाठी फायदेशीर आहारात या पदार्थांचा समावेश करता येतो. सुका मेवा आणि बिया हे प्रोटीन आणि चांगल्या प्रकारच्या चरबीचे स्रोत आहेत. मात्र सुका मेवा निवडताना त्यातील मिठाच्या प्रमाणाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

Heart Health
Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com