Kolhapur road accident Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Kolhapur road accident : कोल्हापुरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

कोल्हापुरात घडली भीषण अपघाताची घटना

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चौघांच्या मृत्यूने आजरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापुरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांच्या जागीच मृत्यू झाल्यानंतर आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. व्होन्याळी गावचे चांदे कुटुंबीय दुंडगे गावाला जात होते. मृत पावलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

व्होन्याळी गावातील दीपक चांदे (39), शोभा चांदे (35), जय चांदे (10), पूर्वा चांदे (7) यांचा असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टी साठी गावाकडे आले होते. गावाकडे नवीन घर बांधल्यानंतर पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावाकडे आले होते. त्यानंतर ते उद्या शुक्रवारी मुंबईला परत जाणार होते. मात्र त्याआधी पाहुण्यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाला निघाले. मात्र वाटेत टेम्पोची धडक बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.

शहापुरात दुचाकीस्वाराचा मृत्यू

तत्पूर्वी, मुंबई-नाशिक महामार्गावरील रेल्वे ब्रिजच्या संरक्षक कठड्याला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार 200 फूट खाली असलेल्या रेल्वे ट्रॅकवर पडला. या घटनेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर झालाय. या दोघांना खर्डी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघे जण राजूर अकोला बाभुळवडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT