Teen Dies After Electric Shock on Terrace in Ujalaiwadi Saam
महाराष्ट्र

ह्रदयद्रावक! क्रिकेट खेळताना विजेचा धक्का लागला, १३ वर्षीय मुलाचा तडफडून मृत्यू

Teen Dies After Electric Shock on Terrace in Ujalaiwadi: अफान असिफ बागवान हा मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. चेंडू शेजारील इमारतीवर गेला, तो तेथे गेला. टेरेसवर विजेचा धक्का लागल्याने शॉक बसून मृत्यू.

Bhagyashree Kamble

कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडी परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. घटनेच्या दिवशी मुलगा शेजारच्या घराच्या टेरेसवर मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. दरम्यान, मुलाचा उच्चदाब विद्युतवाहिनीच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. अफान असिफ बागवान असे मृत मुलाचे नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाईवाडी परिसरात राहत होता. शुक्रवारी शाळेला सुट्टी होती. यामुळे अफान सकाळी मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला.

तो टेरेसवर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळादरम्यान चेंडू शेजारी राहणाऱ्या हनुमंत खांडेकर यांच्या इमारतीच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी अफान टेरेसवर गेला होता. दरम्यान, घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या ११,००० व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युतवाहिनीचा त्याला स्पर्श झाला. लगेचच अफानला विद्युत धक्का बसला. त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मुलाला रूग्णालयात नेले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू

Kolhapur : कोल्हापुरात महाप्रसादातून विषबाधा; २५० पेक्षा अधिक भाविकांना उलट्या-जुलाबाचा त्रास

Non Acidity Pohe Recipe: पित्त न वाढवणारे कांदे पोहे कसे बनवायचे? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Kitchen Hacks : किचनमधील चिकट डब्बे कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

SCROLL FOR NEXT