

विशाल शिंदे, साम टिव्ही
परभणी जिल्ह्यातून एक आगळा वेगळा प्रकार उघडकीस आला आहे. विनालग्न तरूणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका तरूणाला परभणीच्या पालम येथील तरूणीनं जाळ्यात ओढून फसवलं. तिनं तरूणासोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर पु्ण्याकडे जात असताना अंबाजोगाई येथे नवरी दागिने घेऊन पसार झाली. या फसवणुकीनंतर नवरदेवाने पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. सध्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही व्यक्तींच्या संपर्कात आले होते. विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे आणि प्रवीण कानेगावकर यांनी मध्यस्थी करत मुलगी त्यांना दाखवली. या टोळीनं मुलीचा बोगस आधार कार्ड तयार केला. तसेच मुलगी पालम येथील असल्याचं भासवले. मुलगी पसंत झाल्यानंतर ९० हजार रोख, ३५ हजारचे मंगळसूत्र तसेच इतर दागिने, असे एकूण तीन लाख २५ हजार रुपये घेऊन मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणेच ३ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता पालमच्या केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरासमोर, पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. नवदाम्पत्य आपल्या मूळ गावी पुणे येथे जात असतानाच अंबाजोगाई येथे चहा पिण्यासाठी उतरलेल्या नवरीने पाठीमागून आलेल्या गाडीत बसत धूम ठोकली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाने कुटुंबासह पालम पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केले या प्रकरणात एकूण ११ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात याच विवाह सोहळ्याला सहभागी असणाऱ्या दोन महिलेला पालम पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.