chhatrapati shahu maharaj saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shahu Maharaj : अवघं कोल्हापूर उद्या 100 सेकंदासाठी स्तब्ध होणार

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देखील काेल्हापूरवासियांना उपक्रमात सहभागी व्हावे असे केले आवाहन.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त उद्या (शनिवार, ता. 6 मे) सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करुया असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. (Maharashtra News)

शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात (kolhapur) आपण सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे.

आपल्या लोकराजाला आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT