Kolhapur Tantrik Arrested Saam
महाराष्ट्र

'माझ्याकडे सुप्तशक्ती..' भोंदूबाबानं विवाहितेला पळवून नेलं, दरबारात सापडली कंडोमची पाकिटं अन्..

Kolhapur Fake Baba Cheated Many: कोल्हापुरातून धक्कादायक बातमी उघड. भोंदूबाबाचा अनेकांना गंडा, भूतबाधा काढण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक.

Bhagyashree Kamble

कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भोंदूबाबाने चूटकी वाजवून करणी आणि भूतबाधा दूर करण्याचा दावा करून अनेकांचा गंडा घातला आहे. भूतबाधा दूर करण्यासाठी या भोंदूबाबाने आतापर्यंत अनेकांकडून साधारण ६० ते ६५ हजार रूपये उकळले. त्यानं सामान्य आणि गरीब लोकांना फसवण्याचा धंदा चालवला होता. दरम्यान, एका महिलेला फसवल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

सनी रमेश भोसले असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे. भोंदूबाबावर करवीर पोलिसांत तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या दरबारावर छापा टाकला. पोलिसांना छापा टाकल्यानंतर बऱ्याच वस्तू सापडल्या आहेत. वस्तू पाहताच पोलिसांना धक्काच बसला. तक्रारीनुसार, फिर्यादीच्या पत्नीला भोंदूबाबाने सुप्तशक्ती असल्याचे सांगितले. तसेच भूतबाधा दूर करण्यासाठी त्याने ६० ते ६५ हजार रूपयांची मागणी केली.

तक्रारदाराच्या पत्नीनं भोंदूबाबाला ४५ हजार रूपये दिले. मात्र, मदत न करता भोंदूबाबा फिर्यादीच्या पत्नीला घेऊन गेला. यानंतर भूतबाधा काढण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने अनेकांना गंडा घातला. अनेकांनी भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. करवीर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी साताऱ्यातील वाई परिसरात लपून बसला होता.

पोलिसांनी भोंदूबाबाच्या टिंबर मार्केट येथील दरबारावर छापा टाकला. दरबारात पोलिसांना मंत्र- विधीचे काही कागदपत्रे, जनावरांचे कवट्या, दोरे, काळ्या बाहुल्या, टाचणी मारलेली बाहुली, दारूची बाटली अशा वस्तू सापडल्या. धक्कादायक म्हणजे भोंदूबाबाच्या दरबारात कंडोमची पाकिटंही सापडली. दरम्यान, अनेकांनी या भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली असून, सध्या भोंदूबाबाचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT