kolhapur students bus met accident near karnataka 16 injured  Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur Bus Accident: शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात, मुलींचा आक्राेश; कर्नाटक पाेलिस धावले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मदतीला

kolhapur students bus met accident near karnataka : या घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले अशी माहिती बेळगाव पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन परतीच्या मार्गावर असताना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग 4 वरील भुतरामनहट्टीजवळ अपघात झाला. प्राथमिक माहितीनूसार यू-टर्न घेत असताना ट्रकची बसला धडक बसली. या घटनेत सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी 16 जणांना दुखापत झाली हाेती. सर्व जखमींवर बेळगावी बीम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले.

कोल्हापूर येथील एका शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कर्नाटकात गेली हाेती. या विद्यार्थ्यांनी धारवाडच्या कृषी विद्यापीठाला भेट दिल्यानंतर ते राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाकडे गेले.

तेथून परतीच्या मार्गावर असताना ट्रकची बसला मागून धडक बसली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की बसमधील 40 विद्यार्थी जखमी झाले. त्यातील 16 जणांना दुखापत झाली. त्यानंतर तातडीने रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सर्व विद्यार्थी सुखरुप असून जखमींची प्रकृती स्थिर आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत पोलिस भरतीला सुरुवात

Maharashtra Jobs: महाराष्ट्रात सर्वात मोठी शिक्षक भरती; ५,५०० प्राध्यापक पदे भरली जाणार

Salman Khan : आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी, ईमेल केला अन्...

Stomach Gas Problem: पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी काय करावे?

Besan Halwa : महाशिवरात्रीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट बेसन हलवा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT