Kolhapur Crime news Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime : कोल्हापुरात खळबळ; भररस्त्यात दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला

Kolhapur Crime news : कोल्हापुरातून खळबळजनक घटना समोर आलीये . एकाने भररस्त्यात भररस्त्यात दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केलाय.

Vishal Gangurde

जयसिंगपूरमध्ये दोघांवर चाकू हल्ला

भरदिवसा झालेल्या चाकू हल्ल्याने एकच खळबल

या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रणजित माजगावर, साम टीव्ही

कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जयसिंगपूरमध्ये दोघांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा झालेल्या चाकू हल्ल्यात १ जण गंभीर जखमी जाला आहे. तर १ जण किरकोळ जखमी झाला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भररस्त्यात दोघांवर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांत जयसिंगपुरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यानंतर आज भरदिवसा दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. शहरातील या वाढत्या दादागिरीविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या गुन्हेगारीवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं जयसिंगपुरात नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर ११ येथे दोन तरुणांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात आकाश नामदेव नलवडे हा गंभीर जखमी झाला. तर शहारुख मुजावर हा किरकोळ जखमी झाला.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश नलवडे आणि शहारुख मुजावर हे दुपारी दोनच्या सुमारास गल्ली नंबर ११ मधील एका पानटपरीसमोर उभे असताना पुंडलिक गाडीवडर हा मोटारसायकलवर तेथे आले. यावेळी किरकोळ वाद झाला आणि अचानक आरोपींनी जवळ असणारे चाकूने हल्ला चढवला.

हल्ल्यात आकाश नलवडे यांच्या दोन्ही मांडीवर तसेच हाताच्या बोटावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तर शहारुख मुजावर याच्या मांडीवर झालेल्या वारात तो किरकोळ जखमी झाला. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांना मुलतानी माती लावण्याचे चमत्कारिक फायदे , जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

करोडपती यूट्यूबरसोबत संसार थाटणार रितेश देशमुखची अभिनेत्री ? साखरपुड्यावर स्पष्टच बोलली, वाचा नेमकं प्रकरण

Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT