दोन दिवस टिकणारी बॅटरी, स्टायलिश लूक आणि बरंच काही; नव्या स्मार्टफोनची बाजारात धडाकेबाज एन्ट्री होणार

poco smartphone : दोन दिवस टिकणारी बॅटरी, स्टायलिश लूक बाजारात लाँच होतोय. नव्या स्मार्टफोनची बाजारात धडाकेबाज एन्ट्री होणार आहे.
 smartphone
new smartphone Saam tv
Published On
Summary

पोको C85 5G मध्ये 6000mAh ची दोन दिवस टिकणारी बॅटरी 

फोनचे स्लिम आणि आकर्षक डिझाइन तरुणांसाठी डिझाइन

33W फास्ट चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंग 

मुंबई : पोको या स्‍मार्टफोन ब्रँडने आज गुरुवारी पोको सी85 5जी च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या ब्रँडच्‍या २०२५ उत्‍पादन लाइनअपमधील शेवटचा स्‍मार्टफोन आहे. तसेच या स्मार्टफोनची कार्यक्षमता-केंद्रीत सी सिरीजमधील नवीन डिवाईस आहे. भारतातील सतत व्यग्र असलेल्‍या तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलाय. पोको सी८५ मध्‍ये पॉवर दिवसभर कार्यरत राहण्‍याची क्षमता आहे. या पॉवरसाठी या डिवाईसमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

बॅटरी नाविन्‍यता पोकोची सर्वात प्रमुख खासियत आहे. जलद चार्जिंग आणि सडपातळ दिसणारा हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची चार्जिंग दीर्घकाळापर्यंत टिकणारी आहे. यंदा एफ७, एक्‍स७ सीरीज आणि एम७ प्‍लस अशा लाँचसह ब्रँडने बॅटरी कार्यक्षमतेसाठी उद्योग मापदंडांना सतत नव्‍या उंचीवर नेलंय.

 smartphone
कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

पोको सी८५ ५जी तरूण स्‍मार्टफोन युजर्सला दैनंदिन गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलाय. तसेच या फोनमध्ये ड्युअल-टोन फिनिश आणि स्‍लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी भारतीयांच्‍या व्‍यग्र जीवनशैलीशी जुळण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलीये.

 smartphone
मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गेमचेंजर निर्णय; तब्बल ७ किमीचा भुयारी मार्ग तयार करणार, कसा असेल संपूर्ण प्रकल्प?

डिवाईसमधील उच्‍च क्षमतेची ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईस दिवसभर टिकण्याचे खात्री देते. युजर्सला सामान्‍य वापरासह बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. त्यामुळे फोनला सतत चार्जिंग करण्‍याची गरज भासत नाही.

पोको इंडियाच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर पोको सी८५ ५जी चा पहिला लूक आज लाइव्‍ह शेअर करण्‍यात आला. हा स्‍मार्टफोन अधिकृतरित्‍या भारतात ९ डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्‍यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com