Rankala Lake News Saam TV
महाराष्ट्र

Rankala Lake News: कोल्हापुरचं 'मरीन ड्राइव्ह' म्हणून प्रसिद्ध असलेला रंकाळा आटला; कारण काय?

Kolhapur Rankala Lake News: तलावातील पाणीपातळी निम्म्याहून कमी झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolhapur News: कोल्हापुरातील "मरीन ड्राइव्ह" अशी ओळख असेलेल्या रंकाळा तलावावर नेहमीच पर्यटकांची गर्दी उफाळून येते. शहरातील हे तलाव कायम तुडूंब पाण्याने भरलेलं असतं. या तलावाने कोल्हापूरच्या शोभेत आणखीन भर पडली आहे. अशात आता हाच तलाव आटत चालला आहे. तलावातील पाणीपातळी निम्म्याहून कमी झाली आहे.

रंकाळा आटला

राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर झाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. या कडक उन्हाचा परिणाम रंकाळा तलावावर देखील झाला आहे. नेहमीच पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळा सध्या कोरडा पडत चालला आहे. तलावातील पाणी कमी झाल्याने नागरिक तलावाच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटतायत. कडक उन्हाळा आणि त्यानंतर दडी मारुन बसलेला पाऊस यामुळे पाणी आटू लागले आहे.

रंकाळा तलावाचा (Rankala Lake) उल्लेख नेहमीच मरीन ड्राइव्ह असा केला जातो. रंकाळा तलाव २०२ हेक्टर क्षेत्रात पसरला असून तलावाची खोली जवळपास ११ मीटर खोल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तलावातील पाण्याचा वापर शेतीच्या कामांसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तळ्याकाठी शालिनी राजवाडा देखील आहे. त्यामुळे या तलावाची शोभा आणखीन वाढली आहे.

राज्यात काही ठिकाणी गेले दोन दिवस रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र दोन दिवस पाऊस बसरल्यानंतर आज सलग तीसऱ्या दिवशी पाऊस दायब आहे. पावसाने दडी मारल्याने पेरणीच्या कामांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT