- शुभम देशमुख
Bhandara News : शासन व महसूल प्रशासनाची दिशाभूल करीत अवधी झालेल्या रॉयल्टीच्या आधारावर मुरुमाची खुल्या तस्करी करणाऱ्या २ टिप्परला रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली. दोन्ही टिप्परचे पंचनामे केल्यानंतर ते जप्त करून स्थानिक तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. (Maharashtra News)
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील काही भागात नहराचे तर काही ग्रामपंचायत अंतर्गत शेतातील पांदण रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी आवश्यक असलेला मुरूम उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या खणीकर्म विभागाच्या निर्देशानुसार स्थानिक महसूल विभाग अंतर्गत पर्याप्त रॉयल्टी उपलब्ध करण्यात आली आहे.
शासनाच्या महसूल विभागांतर्गत उपलब्ध करण्यात आलेल्या रॉयल्टीचा गैरफायदा घेत काही टिप्पर चालकांनी अवधी बाह्य रॉयल्टी अंतर्गत मुरुमाची खुलेआम तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती.
या माहितीच्या आधारावर साकोलीचे उपविभागीय अधिकारी इंगोले सह अन्य महसूल अधिकारी (officer) कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील मडेघाट येथून मुरूम वाहतूक करणाऱ्या २ टिप्परला थांबवून त्यांची तपासणी केली. यावेळी मुरुमाची वाहतूक करणारे दोन्ही टिप्पर चालकांनी अवधी बाह्य रॉयल्टी दाखविली.
दोन्ही टिप्पर जप्त
दरम्यान, शासनाच्या महसूल विभागांतर्गत निर्गमित रॉयल्टीचा अवधी पूर्ण होऊन देखील त्याच रॉयल्टीचा गैरफायदा उचलित मुरुमाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची घटना उघडकीस येताच महसूल अधिकाऱ्यांनी दोन्ही टिप्परचे पंचनामे करीत जप्त करून स्थानिक तहसील कार्यालयात जमा केले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.