DJ वर नाचण्यावरुन दाेन गटात झाला वाद, रामसेतू पुलावर गाठत युवकांनी त्याला संपवलं; बाबू पेठेतील पाच अटकेत

रामनगर पोलीस हत्येचा अधिक तपास करत आहेत.
Chandrapur News, DJ, Police, Arrests, Youth, Chandrapur Crime News
Chandrapur News, DJ, Police, Arrests, Youth, Chandrapur Crime Newssaam tv
Published On

Chandrapur News : लग्नाच्या रिसेप्शनमध्ये डीजेवर नाचण्यावरून झालेल्या वादानंतर दाेन गटात तुफान मारामारी झाली. त्याचे पर्यवसन राड्यात झाले. या राड्यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे संशयित म्हणून पाच जणांना चंद्रपूर पाेलिस दलाने अटक केली आहे.  (Maharashtra News)

Chandrapur News, DJ, Police, Arrests, Youth, Chandrapur Crime News
Success Story : मुलीने एसटी चालवताच आईच्या चेह-यावर हसू अन् डाेळ्यात आनंदाश्रू; 'भावाचं वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही माझी पल्लवी डगमगली नाही'

चंद्रपूर शहरात रामसेतू पुलानजीक एका लॉनवर आयोजित लग्नाच्या रिसेप्शनमध्ये डीजेवर नाचण्यावरून 2 गटात वाद झाला. हा कार्यक्रम संपल्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने रामसेतू पुलावर किशोर पिंपळकर यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात पिंपळकर गंभीर जखमी झाले.

Chandrapur News, DJ, Police, Arrests, Youth, Chandrapur Crime News
Yavatmal Water Supply News : पाच दिवस यवतमाळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार; जाणून घ्या कारण

त्यानंतर घटनास्थळावरून संशयित पसार झाले. काही नागरिकांनी पिंपळकर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला पुढील उपचारासाठी नेण्याचे सांगण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पिंपळकर यांचा मृत्यू झाला.

Chandrapur News, DJ, Police, Arrests, Youth, Chandrapur Crime News
Wardha Bogus Seeds Factory : वर्ध्यातील बोगस बियाणे कारखान्यात महाराष्ट्रातील 14 नामांकित कंपन्यांच्या नावाखाली झाला गाेरखधंदा

पाचही युवकांना अटक

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी पाचही युवकांचा शाेध घेत त्यांना अटक केली. या गुन्ह्यात आदित्य गुडे, रमेश कोमटी, आर्यन चव्हाण, राहुल दीपक, राज टेकाम या बाबूपेठ भागात राहणाऱ्या पाच युवकांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती (chandrapur) राजेश मुळे (पोलिस निरीक्षक, रामनगर पोलीस स्टेशन) यांनी दिली. 

या गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि काठ्याही पाेलिसांनी जप्त केल्या. शहरातील रामनगर पोलीस हत्येचा अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com