Shahu Maharaj And Sharad Pawar 
महाराष्ट्र

Kolhapur Politics: शरद पवारांनी पकडला शाहू महाराजांचा हात; मविआच्या आंदोलनात चालले साथ-साथ

Shahu Maharaj And Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि शाहू महाराजांनी एकत्र येत कोल्हापूर जिंकलं. आता मविआच्या जोडे मारो आंदोलनात शरद पवार आणि शाहू महाराज हातात हात घेऊन चालले. यामागे विधानसभेचं गणित आहे का? यावरचा हा खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला आणि राज्यात संतापाची लाट उसळली. याच संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार आणि शाहू महाराजही सहभागी झाले. मात्र दोघांच्या एका कृतीनं सगळयांचंच लक्ष वेधून घेतलं.

याच शाहू महाराज आणि शरद पवार चक्क हातात हात घालून चालताना दिसतायेत. शरद पवार आणि शाहू महाराज हे जुने मित्र. मात्र शाहू महाराज राजकारणात सक्रिय नसले तरी सामाजिक कार्याचा धडाका सुरूच होता. त्यामुळे शाहूंना राजकारणात सक्रीय करून कोल्हापूर जिंकण्यासाठी पवारांनी डावपेच आखले आणि कोल्हापुरात वातावरण फिरलं. त्यातूनच शाहू महाराज कोल्हापूरचे खासदार बनल्याची चर्चा रंगलीय.

कोल्हापूरच्या राजकारणात काय घडलं?

26 ऑगस्ट 2023 ला पवारांनी शाहूंची भेट घेत त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले

शाहू महाराज उमेदवारीबाबत इच्छूक नव्हते

20 फेब्रुवारी 2024ला पुन्हा भेट घेऊन उमेदवारीसाठी मनधरणी

शाहू छत्रपती उमेदवारीस तयार झाल्यानंतर जागा सोडण्याबाबत पवारांकडून ठाकरेंची मनधरणी

शाहू महाराजांच्या विजयासाठी पवारांची कोल्हापूरात सभा

शाहू महाराजांच्या उमेदवारीपासून त्यांच्या विजयापर्यंत शरद पवारांचा मोठा हात असल्याचं बोललं जातंय. लोकसभा निवडणूकीवेळी शरद पवारांनी शाहू छत्रपतींचा हात हाती घेतला आणि लोकसभा जिंकली. त्यामुळे आता विधानसभेला कोल्हापुरात कोणता इतिहास घडणार? शरद पवार महायुतीला धोबीपछाड देणार की महायुती मविआचा डाव उलटवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

Today Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT