Leaders of Maha Vikas Aghadi during seat sharing talks in Kolhapur ahead of civic elections. saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटली; शरद पवार गट आघाडीतून बाहेर

Sharad Pawar Faction Exits MVA Kolhapur: कोल्हापुरात महापालिका निवडणुकांमुळे राजकारण तापलंय. याचपार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड झालीय. जागावाटपाच्या वादावरून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

  • कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी फुटल्याची अधिकृत घोषणा

  • जागावाटपावरून शरद पवार गटाचा आघाडीतून काढता पाय

  • राष्ट्रवादी, आप आणि वंचित यांची तिसरी आघाडी तयार

राज्यातील महाविकास आघाडी बनली त्याच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटली आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून बाहेर पडणार आहे.समाधानकारक जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आता आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी याची तिसरी आघाडी निर्माण झाली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून एकमत झालंय. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं जागा वाटपावरून बिनसलं. दरम्यान जागावाटपावरून शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना २५ तारखेला अल्टिमेटम दिला होता.

जर सन्मानजनक तोडगा काढणार नसाल, तर आम्ही तिसरी आघाडी करण्यासाठी सक्षम आहोत, असा इशारा राष्ट्रवादीने दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये १४ जागांची मागणी केली होती. मात्र या जागा देण्यात असमर्थता दर्शवल्याचे सतेज पाटील यांनी म्हटलंय. आमच्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद असूनही आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादीला बोलावलं नव्हतं. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीसह सतेज पाटील यांना अल्टीमेटम देत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

मुंबईत ठाकरेंची रणनीती ठरली? ठाकरेंच्या एकीनं महापालिकेत बळ वाढलं

SCROLL FOR NEXT