Kolhapur Politics: Senior leader quits Congress and joins Eknath Shinde group, creating a major political shock for Satej Patil. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Kolhapur Politics: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अगदी आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते विश्वास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. या घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

Bharat Jadhav

  • कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का

  • विश्वास पाटील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी राजकीय घडामोड

  • सतेज पाटलांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता

कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. कोल्हापुरातील सत्ता काँग्रेसकडेच असावी यासाठी दंड थोपटून मैदानात उतरणाऱ्या सतेज पाटलांना एकनाथ शिंदेंनी जबर दणका दिलाय. शिंदेंनी बड्या नेत्याला आपल्या गोट्यात ओढलंय. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी हे उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

महापालिकेच्या राजकारणामध्ये विश्वास पाटील मोठे नाव नसलं तरी जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ हा सर्वात मोठा सहकारातील केंद्रबिंदू आहे. गोकुळ दूध संघात सत्ता असली तर जिल्ह्यातील सत्ताही हातात येते असं म्हटलं तरी वाईट ठरणार नाही. त्यामुळे विश्वास पाटील यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सत्तेज ठिकाणी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सतेज पाटील यांना आगामी निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष करावा लागेल.

महापालिकेच्या निवडणुकीदरम्यानच गोकुळमध्ये महायुतीने डाव टाकलाय. विश्वास आबाजी पाटील हे शिवसेना शिंदे गटात घेतल्यानंतर शिंदे गट महापालिकेसह गोकूळ दूध संघात सत्ता सुद्धा मिळवण्याच्या बेतात आहे, अशी चर्चा रंगली आहे. विश्वास पाटील शिवसेना शिंदे गटामध्ये जात असल्याने गोकुळच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. कोणत्याही स्थितीत गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीकडून ताकद लावली जातेय.

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सतेज पाटील सध्या विरोधात असले, तरी गोकुळमध्ये मात्र हसन मुश्रीफ आणि ते एकत्र आहेत. दुसरीकडे गोकुळमध्ये २५ वर्ष सत्ता राखलेला महाडिक गट मात्र विरोधात आहे. पाटील आणि मुश्रीफ यांच्या युतीला सुरुंग लावण्यासाठी महायुतीकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आलीय. याचाच एक भाग महापालिका निवडणुकीमध्ये दिसून येतोय. कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध महायुती असाच सामना रंगलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT