कोल्हापुरात खासगी बसवर दरोडा
या दरोड्यात एक कोटी रुपये किमतीचे दागिने चोरट्यांकडून लंपास
कोल्हापूर पोलिसांकडून सात जण ताब्यात
रणजीत माजगावकर, साम टीव्ही
पुणे बेंगळुरू महामार्गावर काल रात्री किनी टोलनाका येथे एका खासगी बसवर दरोडा पडला होता. या दरोडामध्ये एक कोटी रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. या गुन्ह्याचा शिताफीने तपास करत कोल्हापूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह सात जणांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर ते भायखळा या मार्गावर काल रात्री एक खासगी आराम बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात होती. ही खाजगी बस कोल्हापूर सांगली हद्दीवर असणाऱ्या किनी टोल नाका परिसरात येताच अचानक या बसवर सात ते आठ जणांनी बस अडवून दरोडा टाकला.
ड्रायव्हर आणि व्यापाऱ्याला चाकू, कोयत्याचा धाक दाखवून याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यापाराचे तब्बल 60 किलो चांदी, दहा ग्रॅम सोने आणि इतर महत्त्वाचा ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला. या गुन्ह्याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली.
खासगी बसवर दरोडा पडल्याचं कळताच कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. स्थानिक सीसीटीव्हीच्याद्वारे तपास सुरू केला. तर ड्रायव्हर आणि क्लिनरकडे अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. बसच्या क्लिनरने आपल्या गाडीतून दररोज मुंबईच्या दिशेने किमती मुद्देमाल जात असल्याची माहिती त्याच्या मोठ्या भावाला दिली होती. यावेळी त्याच्या भावाने एक कट रचला. या कटाचा मुख्य सूत्रधार अक्षय कदम होता त्याच्या नेतृत्वाखाली सात ते आठ जणांनी प्लॅन करून बसवर दरोडा टाकला... आणि मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांनी तातडीने तपास करून 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केलीये. तर बसमधून लुटलेला सर्व मुद्देमान त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. या दरोड्यात आणखी आरोपी आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.