बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, पण शिंदे गटाचा नेता चौकशीच्या फेऱ्यात अडकला; राजकीय वर्तुळात खळबळ

Akola politics : अकोल्यातील शिंदे गटाचा नेता बनावट चलन प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अकडलाय. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
akola politics
akola news Saam tv
Published On
Summary

बनावट नोटा प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याची चौकशी

नेत्याला ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

चौकशीनंतर नोटिशीनंतर हजर राहण्याचेही आदेश

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यातील राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याला ताब्यात घेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ऐन निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या चौकशीनंतर वेळोवेळी हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत.

akola politics
शिवसेनेचा बुरुज ढासळला; अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेत कमळ फुललं

मालेगावात ऑक्टोबर महिन्यात 10 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाला होता. बनावट नोटा चलनात आणणरे तरुण मालेगाव पोलिसांना रंगेहाथ सापडले होते. या प्रकरणात शिंदे गटाचे नेते दांदळे यांचं कनेक्शन समोर आलं होतं. दीपक पाटील दांदळे हे अकोल्यातील मूर्तिजापुरातील तालुका प्रमुख आहेत. याच दांदळे यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

दांदळे चौकशीच्या फेऱ्यात कसे अडकले?

मागील दोन दिवसांच्या चौकशीत बनावट नोटा चलनात आणण्यात राज्याबाहेरील आणि अमरावती जिल्ह्यातील धारणीतील युवकाचाही हात असल्याचं समोर आलं. धारणीतील या संशयित युवकाच्या कॉल सीडीआरमध्ये मूर्तिजापूरातील शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे यांचा मोबाइल नंबर सापडला. त्यानंतर रविवारी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची रविवारच्या दिवशी चौकशी झाली.

akola politics
ऐन निवडणुकीत शिवसेनेवर दु:खाचा डोंगर; सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

ऐन नगरपरिषदेच्या निकालाच्या दिवशी पोलिसांकडून दांदळे यांची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर दांदळे यांना नोटीस बजावून तपासकामी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. नाशिकच्या पोलिसांनी शिंदेसेनेच्या तालुका प्रमुखाला बनावट नोटा प्रकरणात ताब्यात घेतल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com