Kolhapur Villagers Aggressive On Talathi Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक, तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कोंडलं; नेमकं काय घडलं?

Kolhapur Villagers Aggressive On Talathi: जनावरांचा चारा आणि औषध देण्याचा सूचना तहसीलदारांनी केल्या होत्या. मात्र तहसीलदार गेल्यानंतर काम करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याना संतप्त होत गावकऱ्यांनी कार्यालयामध्येच कोंडलं.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरमध्ये संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तलाठी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार घडला. शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात ही घटना घडली आहे. पुरस्थितीत काम करण्यास नकार दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जनावरांचा चारा आणि औषध देण्याचा सूचना तहसीलदारांनी केल्या होत्या. मात्र तहसीलदार गेल्यानंतर काम करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याना संतप्त होत गावकऱ्यांनी कार्यालयामध्येच कोंडलं.

कोल्हापुरातील पूरग्रस्तांना कोणत्याही सुविधा नाहीत की मदत नाही. प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे पूरग्रस्त आणि जनावरांचे हाल होत असल्याने शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथे अन्याय निवारण कृती समितीतर्फे गाव चावडीसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. होते. यावेळी पूरग्रस्त आणि अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने संतापलेल्या पूरग्रस्तांनी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, तलाठी, कृषी सेवक, आरोग्य सेवक, मंडल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांना तलाठी कार्यालयातच कोंडून ठेवले.

संतप्त झालेल्या महिलांनी तलाठी कार्यालयाची कडी बाहेरून लावून घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकाऱ्यांच्या माफीनंतर पूरग्रस्त शांत झाले. शिरढोण इथल्या पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना सेवा मिळावी. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी, पूरबाधित पिकांचा पंचनामा केला जावा, या मागणीसाठी कृती समितीने सोमवारी सकाळी शिरढोन गाव चावडीसमोर धरणे आंदोलन केले होते.

दरम्यान, मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पूरामुळे कोल्हापूर शहरासह अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले, संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. जनावरांना साठवून ठेवलेला चारा देखील पूरामध्ये वाहून गेला. कोल्हापुरातील पूराचे पाणी ओसरला पण कोल्हापुरकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT