Chhattisgarh Health Center: धक्कादायक! आरोग्य केंद्रावर वीज संकट; मोबाईल टॉर्चच्या उजेडातच रुग्णांवर उपचार

Chhattisgarh Bhopalpatnam community Health Center: भोपाळपट्टणम कम्युनिटी आरोग्य केंद्राला वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे रुग्णांवर अंधारातच उपचार केले जात आहेत. महिलेलांची प्रसूतीसुद्धा देखील मोबाईल टॉर्चने केली जात आहे.
Chhattisgarh Health Center: धक्कादायक! आरोग्य केंद्रावर वीज संकट; मोबाईल टॉर्चच्या उजेडातच रुग्णांवर उपचार
Chhattisgarh Bhopalpatnam community Health Center
Published On

रायपूरमधील भोपाळपट्टणमच्या आरोग्य केंद्रातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वारंवार वीज खंडीत होण्यामुळे भोपाळपट्टणममधील कम्युनिटी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना अंधारात रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. वीज खंडित होत असल्याने मोबाईल टॉर्चच्या उजेडातच महिलांची प्रसूती करावी लागत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, या आरोग्य केंद्रातील दोन जनरेटरसह अत्यावश्यक उपकरणे दोन वर्षांपासून बंद आहेत. तर नवीन आलेले जनरेटर अनइन्स्टॉल आहेत. त्यात रुग्णालयाच्या छतावर असलेले सौर पॅनेलदेखील बंद आहेत. वीज नसल्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या लसी खराब होत आहेत. रुग्णालयात वीज नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून टायफॉइडच्या चाचण्या बंद पडल्या आहेत. तर तुटलेल्या सीबीसी मशीनमुळे रूग्णांवर योग्य उपचार करणे शक्य नसल्याने हॉस्पिटलच्या लॅब चाचण्या बंद पडल्या आहेत.

आरोग्य केंद्रात दिवसाला १५० हून अधिक रुग्ण रुग्णालयात येत आहेत. बहुतेकांमध्ये ताप किंवा मलेरियेची लक्षण आढळत आहेत. पावसाळ्यात अनेक रुग्ण मोसमी आजारांच्या तक्रारी घेऊन येत सीएचसीमध्ये असतात. मात्र विजेच्या समस्येमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करता येत नाहीत. यामुळे रुग्ण आणि डॉक्टरांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री श्याम जयस्वाल यांनी आरोग्य विभागातील परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले होते. तरीही केंद्राची स्थिती बदलेली नाही. रुग्णालयाच्या परिसरात अस्वच्छता परसरलीय. दोन आउट-ऑफ-ऑर्डर जनरेटर बदलले गेले नाहीत.

दरम्यान या समस्यांची माहिती आरोग्य विभागापर्यंत पोहोचली तेव्हा प्रशासनाला जाग आली आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात नवीन जनरेटर बसविण्याचे आदेश दिलेत. CHC चे BMO, डॉ. चलपती राव यांनी पुष्टी केली की मलेरिया चाचणी चालू आहेत, मात्र टायफॉइडच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत. तसेच काही उपकरणे सुस्थितीत आहेत. रुग्णालयाला येणाऱ्या अडचणी उच्च अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यात. तसेच काही उपकरणे सुस्थितीत आहेत. रुग्णालयाला येणाऱ्या अडचणी उच्च अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यात. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेले नवीन जनरेटर सुरू असलेल्या दिरंगाईमुळे व गैरव्यवस्थापनामुळे अद्याप बसविण्यात आले नसल्याचेही डॉ. राव यांनी सांगितले.

Chhattisgarh Health Center: धक्कादायक! आरोग्य केंद्रावर वीज संकट; मोबाईल टॉर्चच्या उजेडातच रुग्णांवर उपचार
Chandigarh Court Firing : सस्पेंड पोलीस महानिरीक्षकाचा पारा चढला, अधिकारी जावयाला भरकोर्टात गोळ्या घातल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com