Saam Impact : महिलांकडून पैसे घेणारा तलाठी निलंबित; लाडकी बहीण योजनेत अकोल्यात सुरु होती लूट

Akola News : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाचं महत्वाचा असतो.
Saam Impace
Saam ImpaceSaam tv

अक्षय गवळी, साम टीव्ही


अकोला
: अकोल्यात लाडकी बहीणीची लूट सुरू असल्याचा प्रकार 'साम'ने उघडकीस आणला होता. तलाठी महिलांकडून पैसे घेत असल्याचा विडिओ समोर आला होता. या संदर्भात साम'नं सर्वात आधी बातमी दाखवली होती. या बातमीची दखल अकोला जिल्हा प्रशासनाने घेत तलाठीला निलंबित केले आहे.

Saam Impace
Ladki Bahin Yojana : नंदुरबार जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सर्व्हर डाऊन; उत्पन्नाचा दाखला काढणाऱ्यांच्या रांगा

राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित आहे. यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाचं महत्वाचा असतो. त्यासाठी अकोल्यातल्या (Akola) मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी आहे. या दरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचे दिसत आहे. मोठी उमरीतल्या तलाठी कार्यालयातील काल सायंकाळचा हा प्रकार होता. 

Saam Impace
Milk Price : दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; तासगाव तहसीलवर जनावरांसह मोर्चा, अकोले तालुक्यात शेतकऱ्यांनी केले मुंडन

सदरच्या प्रकाराबाबत 'साम' टीव्हीने बातमी प्रसारित (Saam Impact) केली. याची दाखल प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार अकोल्यात पटवारी दाखला देण्यासाठी महिलांकडून पैसे घेणाऱ्या तलाठ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अकोला तहसीलदारांनी तलाठ्याची चौकशी करत चौकशीअंती या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राजेश शेळके असं या निलंबित केलेल्या तलाठीचे नाव आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहे. दरम्यान अमरावती पाठोपाठ अकोल्यात पैसे घेणारा तलाठीवर निलंबनाची कारवाई करण्यात अली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com