Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : शाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू; कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Kolhapur News : केर्ले येथील कुमार व कन्या हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा सहावीच्या वर्गात शिकत होता

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : शाळेच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेत गोंधळ घातला होता. 

कोल्हापुर (Kolhapur News) जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत स्वरूप दिपकराज माने असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. केर्ले येथील कुमार व कन्या हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा सहावीच्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी शाळेत गेला होता. तो गेटजवळ आला असताना लोखंडी गेट तुटून पडल्याने त्याखाली तो दबला जाऊन यात त्याचा मृत्यू झाला. 

घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सदर मुलगा हा लघूशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट अंगावर पङल्याने (Student) विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं शाळा प्रशासनाने सांगितले. मात्र या घटनेने शाळा प्रशासनाची बेपर्वाई समोर आली असून मुलाच्या मृत्यूमुळे पालकांनी एकच आक्रोश केला. तर ग्रस्थानी शाळेत गोंधळ घातला होता. तसेच घोषणाबाजी करत शिक्षक व शाळा प्रशासनाला जाब विचारला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT