Kolhapur News Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : शालेय पोषण आहार खाल्ल्याने विद्यार्थिनींना त्रास; पन्हाळा तालुक्यातील प्रकार, पालक संतप्त

Kolhapur News : शाळेतील विद्यार्थिनींनी आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला. यानंतर काही वेळाने सहा मुलींना अचानक जुलाब व उलट्या झाल्या. या मुलींना कोतोली येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : शालेय पोषण आहारातील तक्रारी अजूनही कमी होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलींना शालेय पोषण आहार खाल्ल्यानंतर अचानक उलट्या व जुलाब सुरू झाल्याचा त्रास झाला. यानंतर त्यांना तात्काळ कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ही माहिती समजताच पालक आक्रमक झाले होते. 

शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे वारंवार समोर आले आहे. धान्य पुरवठ्याशी शिजवून दिलेल्या आहार देखील चांगला नसल्याच्या तक्रारी आहेत. पंढरपूर मधील शाळांमध्ये पोषण आहारातील खिचडी खाल्ल्यानंतर उलट्या आणि जुलाब होण्याचा त्रास विद्यार्थ्यांना झाला होता. तसाच त्रास कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माळवाडी येथील विद्यामंदिर माळवाडी या प्राथमिक शाळेत इयत्ता सहावी सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी त्रास झाला आहे. 

रुग्णालयात उपचार सुरु 

शाळेतील विद्यार्थिनींनी आज सकाळी शालेय पोषण आहार खाल्ला. यानंतर काही वेळाने सहा मुलींना अचानक जुलाब व उलट्या सुरू झाल्या. त्रास अधिक जाणवत असल्याने या मुलींना लागलीच कोतोली येथील प्राथमिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर प्रकारची माहिती मुलींच्या पालकांना देण्यात आली. यानंतर पालक रुग्णालयात दाखल झाले होते.  

शालेय कमिटी अध्यक्षांची सारवासारव 

पालक आरोग्य केंद्रात आले असता त्यांनी शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. मुलांना शिळे जेवण का देता?, करपलेला भात का देता?भातामध्ये आळ्या सापडतात, टोके सापडतात मग तुम्ही करता काय? असा आरोपही पालकांनी यावेळी केले. तर संबंधित शाळेच्या व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष के. पी. खोत या संपूर्ण प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शालेय पोषण आहार व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT