सोलापूर : गावातील मुले मिळून गल्ली खेळत होते. यात बॅट्समनने मारलेला चेंडू सापडत नसल्याने सर्वजण चेंडू शोधत होते. चेंडूचा शोध घेत असताना एका मुलाचा तोल जाऊन विहिरीत पडला. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरच्या कंदलगावात घडली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेत ओंकार संजय चव्हाण (वय १५) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. कंदलगावातील निंबर्गी रस्त्यावर असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातील विहिरी लगत मोकळे मैदान आहे. या मैदानावर गावातील काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यामध्ये ओंकार चव्हाण हा देखील क्रिकेट खेळत होता.
पाय घसरून पडला विहिरीत
दरम्यान एका मुलाने मारलेला चेंडू विहिरीकडे गेला. शोध घेतला असताना चेंडू सापडत नसल्याने सर्वच मुले चेंडू शोधण्यासाठी विहिरीजवळ आले. तेव्हा विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधताना पाय घसरल्याने ओंकार हा ७५ फुट खोल असलेल्या विहिरीत पडला. ओंकारचा पाण्यात पडल्यानंतर दगडावर डोके आपटल्याने डोके फुटले. यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सोबतच्या मुलांची गावात धाव
ओंकार विहिरीत पडल्याने सोबतची मुले घाबरली आणि त्यांनी गावाकडे धाव घेत घटनेची माहिती गावात दिली. यानंतर ओंकारच्या आई- वडिलांसह गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत शोध सुरु केला. पण विहिरीला पायरी नसल्याने विहिरीत उतरने अवघड झाले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मंद्रूप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान याबाबत मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.