RTE : आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी, टिटवाळ्यातील शाळांमधील धक्कादायक प्रकार

Titwala News : आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मुलांना चांगल्या शाळेत पाठविता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश दिला जातो
RTE
RTE Saam tv
Published On

अभिजित देशमुख 
टिटवाळा
: गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आरटीई अंतर्गत शिक्षण व्यवस्था सूरु केली. आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या फीसह शैक्षणिक साहित्य देखील मोफत पुरवले जाते. मात्र कल्याण जवळील टिटवाळा मांडा परिसरात काही शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले आहे. 

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मुलांना चांगल्या शाळेत पाठविता येत नाही. अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने आरटीई अंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवून त्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो. परंतु शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर देखील या विद्यार्थ्यांना त्रास कायम आहे. बहुतांश शाळेत २५ टक्के आरक्षण अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिला जात असल्याचा प्रकार टिटवाळा येथे समोर आला आहे. 

RTE
School Van Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला भीषण अपघात; समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी

त्या विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी 

सदरच्या खाजगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य मोफत पुरवणे बंधनकारक असताना काही शाळांकडून शालेय साहित्याच्या नावाने पैसे उकळले जात आहे. असा गंभीर आरोप शिवसेना पदाधिकारी विजय देशेकर यांनी केला आहे. तसेच काही शाळांमध्ये तर चक्क आरटीइ अंतर्गत घेतलेल्या विद्यार्थ्यांची वेगळी तुकडीच तयार करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

RTE
Water Shortage : वीस दिवसांआड पाणीपुरवठा; १९ गावातील नागरिकांचे टाकीवर चढत आंदोलन

शाळांवर कारवाईची मागणी 

दरम्यान या प्रकाराबाबत संबंधित शाळांकडे वारंवार पाठपुरावा व तक्रारी करून देखील काहीच कारवाई न झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रश्नी पालकांसह देशेकर यांनी केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेत संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com