Water Shortage : वीस दिवसांआड पाणीपुरवठा; १९ गावातील नागरिकांचे टाकीवर चढत आंदोलन

Akola News : अकोला जिल्ह्यातील आपातापा व परिसरातील गावांसाठी खांबोरा पाणी पुरवठा योजनेच्या कामास गेल्या २ वर्षापासुन पुनर्जीवनाचे ७३ कोटी रूपयाचे काम सुरू आहे. त्यामधील काही महत्वाची कामे शंभर टक्के पुर्ण झाली
Water Shortage
Water ShortageSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : गावात १५ ते २० दिवसाआड १९ गावात पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांना भीषण पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे. त्यातच आवश्यकतेनुसार नदीकाठी झरे तयार करून महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागते. या सर्व परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आपातापा गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु केले. यात महिलांचा देखील सहभाग आहे. 

अकोला जिल्ह्यातील आपातापा व परिसरातील गावांसाठी खांबोरा पाणी पुरवठा योजनेच्या कामास गेल्या २ वर्षापासुन पुनर्जीवनाचे ७३ कोटी रूपयाचे काम सुरू आहे. त्यामधील काही महत्वाची कामे शंभर टक्के पुर्ण झाली आहेत. सुकळी ते घुसर या गावापर्यंत नविन ६०० एमएम, ५०० एमएम, ४०० एमएमची पाईप लाईन टाकुन पुर्ण झाली. हा अत्यंत महत्त्वाच्या टप्पा पुर्ण केल्यानंतरही १५ ते २० दिवसाआड अपूर्ण पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तीन दिवसात पाणीपुरवठा व्हावा, अशा मागणीसाठी गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले.

Water Shortage
School Van Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला भीषण अपघात; समोरून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी

महिलांची घोषणाबाजी 

अकोल्यातल्या आपातापा गावात गावाकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासापासून गावकऱ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. अकोल्यातल्या आपातापा गावात असलेल्या एका पाण्याच्या टाकीवर चढत तब्बल १९ गावांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात तब्बल १९ गावातील महिलांनी सहभाग नोंदवला. आंदोलनात महिला आक्रमक होत पाण्याच्या टाकी खाली बसून जोरदार घोषणाबाजी देत आहेत.

Water Shortage
Pune Fraud Case : बनावट कंपन्या स्थापन करून बनवाबनवी; १५० गुंतवणूकदारांची अडीच कोटींत फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल

या गावाच्या पाणी प्रश्नासाठी सुरु आहे आंदोलन
बारूला विभागातील आपातापा, आपोती खु,, आपोती बु., खोबरखेड, मोराळी, एकलारा, आखत्तवाडा, शामाबाद, घुसर, सुलतान अजमपुर, अनकवाडी, घुसरवाडी, कासली, म्हातोडी, अंबीकापुर, दापुरा, गोणापुर, मजलापुर ह्या गावाच्या संपूर्ण नागरीकांसह महिलांना पाणी टंचाईच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com