shipekarwadi, kolhapur, landslides saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Landslide Survey : जीव गेला तर बेहत्तर...घर साेडणार नाही, कोल्हापूरातील दरड प्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ 'या' भूमिकेवर ठाम

गावात गेल्या ४ दिवसांपासून लाईट नसल्याने गावकऱ्यांना रात्र अंधारात आणि भीतीच्या सावटाखाली काढण्याची वेळ आली आहे.

Siddharth Latkar

- रणजित माजगावकर

Kolhapur News : माळीण, तळीये त्यानंतर आत्ता इर्शाळवाडी (Landslide in Irshalwadi village) मध्ये भूस्खलन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालं असलं तरी आजही अनेक गाव भूस्खलनाच्या छायेत आहेत. असेच एक गाव काेल्हापूर जिल्ह्यात देखील आहे. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी (shipekarwadi) येथील स्थिती देखील बिकट आहे. प्रशासनाने या गावातील ग्रामस्थांना नोटीसा देऊन स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ज्या गावांत भूस्खलनाची शक्यता आहे तेथील गावांना सतर्कतेचा आदेश प्रशासनाने दिला आहे. काेल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूसखलनाचा धोका आहे. संकटकाळी नागरिकांना मदत व्हावी यासाठी एनडीआरआफचे पथक देखील जिल्ह्यात तैनात आहे.

कोल्हापूरातील करवीर तालुक्यात डोंगरावर वसलेल शिपेकरवाडी गाव हे त्यापैकीच एक गाव असे आहे. 527 कुटुंब असलेल्या या गावाला गेल्या वर्षी भूस्खलन सामना करावा लागला होता. आता देखील या गावाला भूसखलनाचा धोका निर्माण झाला आहे. रोज येथील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत सगळे भीतीच्या सावटा खाली राहत आहेत.

ज्यादा पाऊस (rain) सुरू झाला की राज्यातील अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढत असतो. नुकत्याच घडलेल्या रायगड मध्ये इर्शाळवाडीची घटना असो किंवा माळीनची घटना संपुर्ण गाव काही क्षणात ढीगार्‍याखाली दबला गेला आणि राहिले ते फक्त आठवणी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या या शिपेकरवाडी गावातील ग्रामपंचायत तर्फे गावातील लोकांना स्थलांतर होण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे. मात्र नागरिक आपलं राहतं घर सोडून जाण्यास तयार नसून स्थलांतर करायचं असेल तर कायमच करा अशी मागणी गावकरी करत आहेत.

दरम्यान इस्त्रोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लँडस्लाईड ॲटलास अहवालात भारतातील भूस्कलनाचा अधिक धोका असलेल्या आणि लोकसंख्येची प्रमाण जास्त असलेल्या 147 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.

यामध्ये राज्यातील 11 जिल्हे असून यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि मुंबई सबर्न, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्हा हा 133 व्या स्थानावर असून जिल्ह्यातील 76 गावांना भूसखलनाचा धोका आहे.

ज्यामध्ये जिल्हयातील करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, कागल, चंदगड, गगनबावडा या तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. या गावातील ग्रामपंचायत तर्फे गावातील लोकांना स्थलांतर होण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे. मात्र नागरिक आपलं राहतं घर सोडून जाण्यास तयार नसून स्थलांतर करायचं असेल तर कायमच करा अशी मागणी गावकरी करत आहेत.

सध्या या गावात गेल्या ४ दिवसांपासून लाईट ही नसल्याने गावकऱ्यांना रात्र अंधारात आणि भीतीच्या सावटाखाली काढण्याची वेळ आली असून देव करो इर्शाळवाडी आणि माळीन गावसारखी दुर्घटना न घडो मात्र शासनाने ही वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. भूस्खलनाच्या भीतीने अनेक गाव आणि गावातली माणस पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पावलं उचलणं काळाची गरज निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT