रामटेकच्या मंदिरातील ‘नंदी’ सांगतो पाप-पुण्याचा हिशोब? जाणून घ्या कसा होते हा न्याय

Surabhi Jayashree Jagdish

रामटेक

रामटेक मंदिरातील भगवान शिव आणि श्रीराम यांचा संबंध सांगणाऱ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या पार्श्वभूमीवर नंदीच्या मूर्तीखालून जाण्याची प्रथा इथे अधिक दृढ झाली.

नंदी

नंदी हे भगवान शिवांचे वाहन आणि द्वारपाल मानले जातात. मंदिरात देवदर्शनापूर्वी नंदीला नमस्कार करणं म्हणजे देवाकडे जाणाऱ्या मार्गाचा सन्मान असतो. नंदीच्या खालून जाणं म्हणजे नम्रतेने देवाचरणी शरण जाण्याचं प्रतीक.

मान्यता काय आहे?

लोकपरंपरेनुसार, नंदीच्या खालून जाताना मनुष्य आपला अहंकार खाली ठेवतो असं मानलं जातं. अहंकार कमी झाला की मन शुद्ध होण्याची भावना जागते.

आख्यायिका काय आहे?

एक आख्यायिका सांगते की, श्रीरामांनी रावण वधानंतर पापक्षालनासाठी शिवाचे दर्शन घेतलं. तेव्हा शिवांनी नंदीच्या माध्यमातून प्रायश्चिताचं महत्व श्रीरामांना सांगितले. त्या कथेशी नंदीखालून जाण्याची प्रथा जोडली जाते.

नंदीच्या खालून जाणं

नंदीच्या खालून जाणे हे पाप धुतले जातात म्हणून नसून मनाची शुद्धी यासाठी सांगितलं गेलं आहे. जेव्हा मनातील राग, मत्सर, अभिमान बाजूला ठेवला जातो तेव्हाच भक्ती फलदायी होते.

परंपरा

रामटेकमध्ये ही परंपरा विशेष भाविकतेने पाळली जाते. भाविक दूरवरून याठिकाणी येऊन नंदीखालून जाऊन मनाची शांती अनुभवतात. त्यांना याने आंतरिक हलकेपणा आणि श्रद्धा वाढल्याचा अनुभव मिळतो.

धर्मग्रंथांमध्ये नियम नाही

ही प्रथा धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट नियम म्हणून नाही, तर लोकश्रद्धा आणि अध्यात्मिक अनुभूतीच्या रूपाने टिकून आहे. श्रद्धेने केलेली कृती मनाला शांती देते, आणि मन शांत झाले की जीवनात सकारात्मकता वाढते.

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Bhakri Tips | saam tv
येथे क्लिक करा