Kolhapur News Mla Rohit Pawar reaction to Jayant Patil going to BJP Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar on Jayant Patil: जयंत पाटील भाजपसोबत जाणार? रोहित पवारांनी एका वाक्यात विषयच संपवला

Rohit Pawar on Jayant Patil: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासून जयंत पाटील हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला.

विजय पाटील

Rohit Pawar on Jayant Patil: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटील हे लवकरच भाजपात प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे.

त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात उलट सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

सांगलीचे लोकल नेत्याच्या वक्तव्यावर लक्ष देऊ नका, जयंत पाटील हे शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबत असतील, असं आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे. कोण काय उल्लेख करतील याकडे आपण दुर्लक्ष करायचे. ज्यांनी (भाजपने) शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी फोडली, त्यांचा स्वत:च्या कार्यकारणीवर विश्वास राहिला नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

भाजपची नेहमी पक्ष फोडाफोडीची प्रवृत्ती राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून त्यांना किती यश आले हे माहित नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे फोटो लावून संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. ती त्यांची (अजित पवार गट) रणनीती असू शकते, लोकांचा प्रतिसाद काय आहे हे महत्वाचे आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

आमच्या पक्षात कुठलीही फूट पडली नाही - सुप्रिया सुळे

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या दाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षात कुठलीही फूट पडली नसून जयंत पाटील कुठेही जाणार नाही. अजित पवार हे आमचेच आहेत. फक्त त्यांचे मत वेगळं असल्याने ते तिकडे गेलेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

खासदार संजय काका पाटील काय म्हणाले होते?

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहे. तर काही एकनिष्ठ नेते अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. जयंत पाटील सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते आता भाजपसोबत जातील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

जयंत पाटील भाजपात येतील, असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत. सांगलीच्या मिरजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना संजयकाका पाटील यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. या कार्यक्रमात भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT