Kolhapur News Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'खासदार हरवला आहे...' धैर्यशील मानेंचे पोस्टर्स झळकावत मराठा बांधवांचे आंदोलन

Kolhapur News: मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केल्याचा उल्लेख या पोस्टर्सवर करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest Kolhapur:

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर प्रत्येक गावागावात मराठा समाजाकडून आंदोलने होत आहेत. मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेची झळ राजकीय नेत्यांनाही पडत असल्याचे चित्र आहे. गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याचे फलक झळकत असतानाच कोल्हापूरमध्ये मराठा बांधवांकडून धैर्यशील माने हरवल्याचे पोस्टर्स झळकावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातील (Kolhapur) मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरकरांच्या या आक्रमक भूमिकेचा फटका शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बसल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापुरातील पेठ वडगावमधील मराठा बांधवांनी शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने हरवल्याचे पोस्टर्स झळकावून आंंदोलन केले.

गोरा, दाढी वाढलेला खासदार हरवला आहे मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केल्याचा पोस्टरवर उल्लेख या पोस्टर्सवर करण्यात आला आहे. खासदारांनी लवकरात लवकर परत यावं, तुमच्यावर कोणीही रागवणार नाही, तुमची खूप आठवण येते असेही या पोस्टरवर लिहण्यात आले आहे. तसेच खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) हरवल्याची पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.

लातुरमध्ये मराठा बांधवांचे जलसमाधी घेत आंदोलन.

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ इथल्या शिवपूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने घरणी मध्यम प्रकल्पात जलसमाधी घेत आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेत, सरसगट मराठा समाजाला आरक्षण द्या.,या मागणीसाठी आज गावातील मराठा बांधवांनी हे जलसमाधी आंदोलन केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT