Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

Kolhapur News : परिसरात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहण्यास मिळत असून परिसरात नेहमीच भीतीचे वातावरण असते. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे

Rajesh Sonwane

रणजित माजगावकर 

कोल्हापूर : रात्रीच्या वेळी घरात असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केला. यात वृद्ध पती- पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

कोल्हापूर तालुक्यातील शाहूवाडी तालुक्यातील परळी निनाई परिसरात सदरची घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात रुक्मिणीबाई कंक (वय ७०) आणि निनो कंक (वय ७५) या वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कंक हे वृद्ध दाम्पत्य जंगल परिसरात असलेल्या धरणाजवळ वास्तवास होते. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच पाहण्यास मिळत असून परिसरात नेहमीच भीतीचे वातावरण असते. ऐन दिवाळीत ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

घरात असलेल्या दाम्पत्यावर हल्ला 

दरम्यान धरणाजवळ राहणाऱ्या या दांपत्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केला. यात रुक्मिणीबाई यांना फरपटत नेऊन त्यांच्या शरीराचे लचके तोडले. तर निनो कंक यांना धरणाच्या पाण्यात फरफटत नेले होते. दाम्पत्याची ताकद कमी पडल्याने बिबट्याने दोघांनाही भक्ष बनविले. सकाळी काही गावकऱ्यांना सदर घटना निदर्शनास आली. यानंतर या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं शाहूवाडी वनविभाग आणि पोलिसांना कळवले. 

बंदोबस्त करण्याची मागणी 

माहिती मिळल्यानंतर वनाधिकारी उज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी बिबट्याचे पंजांचे ठसे आढळले, ज्यामुळे हल्ला बिबट्याचाच असल्याचे निष्पन्न झालं. शाहूवाडी तालुक्यात वारंवार होणाऱ्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण पसरलंय. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका; रोहित शर्मा संघातून बाहेर जाणार?

Wardha Heat Wave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अंगणवाडी,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये टोळक्याकडून दोन तरुणांना बेदम मारहाण

Shocking : बहिणीचा मृत्यू,भावानं बाथरुममध्येच केले अंत्यसंस्कार; अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT