Kolhapur Flood  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Flood: पुण्यानंतर कोल्हापूरात भीषण पूरस्थिती, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा पूराचा वेढा

Kolhapur Flood Latest Update : कोल्हापूरची पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची मछिंद्री झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले आहेत.

Priya More

रणजीत माजगावर, कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ४४ फूट इतकी आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी (Panchaganga River) धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची मछिंद्री झाली आहे. आता मछिंद्री झाली म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मच्छिंद्र म्हणजे पंचगंगेच्या महापुराची उच्चत्तम पातळी मोजण्याची स्थिती आहे.

पंचगंगा नदीवर १८७८ साली बांधण्यात आलेला शिवाजी पूल आहे. सध्या नवीन पूल बांधल्यामुळे हा जुना पूल वापरला जात नाही. या पुलाला ५ दगडी कमानी आहेत. या कमानी ज्या दगडी पिलरवर उभ्या केल्या आहेत. तिथं बांधकामालाच माशाच्या शरीरासारखा निमुळता आकार आहे. या ठिकाणापर्यंत पुराचे पाणी पोहोचले किंवा या माशासारख्या निमुळत्या आकाराच्या पुलाच्या दगडावरून पंचगंगेच्या पुराचे पाणी वाहू लागले की मच्छिंद्र झाली असे समजतात. पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते तरीही मच्छिंद्र झाली. मच्छिंद्र झाली अशी वार्ता करत कोल्हापुरात पूर आल्याचे संकेत दिले जात होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खिद्रापूर, राजापूर , राजापूर वाडी गावातील नागरिकांनी कुटुंबासह जनावरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसतो. यावेळी देखील शिरोळा तालुक्याला पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीतील घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे जीर्ण होऊन घराची भिंत कोसळली. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या बाबत सरकारला गांभीर्य नाही. आम्ही सांगितल्यानंतर पूर नियोजनाची बैठक प्रशासनाने घेतली. अद्यापही पूरग्रस्तांना मदत सरकारने दिली नसून यामध्ये राजकारण केले जाते की काय अशी शंका असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. शिवाय केंद्र सरकारही महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अलमाटी मधून पाणी सोडण्यास सांगितले नसतं तर कोल्हापूर अर्ध पाण्यात बुडाल असतं असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आज कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी केल्यानंतर माध्यमांशी बोलताा त्यांनी सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT