Kolhapur News  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचं आगीवर नियंत्रण

कोल्हापुरातून मोठी बातमी हाती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील शेरा प्लस या कंपनीला भीषण आग लागलेली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Kolhapur News : कोल्हापुरातून मोठी बातमी हाती आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील शेरा प्लस या कंपनीला भीषण आग लागलेली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातील 15 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील शेराप्लस कंपनीच्या रसायन गोडवूनला आग (Fire) लागली असून 15 हुन अधिक फायर ब्रिगेडच्या गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहेत. भीषण आगीमुळं कंपनी जळून खाक झालेली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने धुराचे लोट औद्योगिक वसाहत परिसरात पसरले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.या आगीमुळे जीवित हानी झाली आहे की नाही याचा तपास सुरू आहे, भीषण आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे.

अग्निशमन दलाचं आगीवर नियंत्रण

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. कंपनी आग लागल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीलाही आग लागण्याची शक्यता होती. आगीवर नियंत्रण मिळवाता बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT