Solapur : सत्यजित तांबेंच्या कृतीला बाळासाहेब थोरातांचा आतून पाठिंबा? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शंका

नाशिक पदवीधर निवडणुकीतील राजकारणावर भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे
radhakrishna vikhe patil , balasaheb thorat
radhakrishna vikhe patil , balasaheb thoratsaam tv

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीत राजकारण चांगलंच तापलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पवार यांना पाठिंबा जाहीर केला. या सर्व राजकारणावर भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

radhakrishna vikhe patil , balasaheb thorat
Manish Sisodia CBI Raids : मनीष सिसोदियांच्या कार्यालयावर CBI चे छापे; म्हणाले, काही नाही मिळणार!

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe Patil) आज, शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली हे माहिती नाही. मात्र, सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, भाजप पक्ष नेतृत्व कोणाला संधी देईल त्याचा प्रचार करू. मात्र अचानक या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे संभ्रमावस्था आहे'.

'सत्यजित तांबे यांच्या वडिलांनी तीन वेळा मतदार संघाचे नेतृत्व केलेलं आहे. त्यातच त्यांची मतदार नोंदणी चांगली आहे. असे सर्व असताना सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला हे माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले.

'सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा या सर्व कृतीला आतून पाठिंबा आहे का याबाबत शंका आहे. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी या सर्व गोष्टींबाबत खुलासा केला पाहिजे. ते चुप्पी साधून का आहेत हे कळत नाही, असे विखे पाटील पुढे म्हणाले.

radhakrishna vikhe patil , balasaheb thorat
Maharashtra Politics: ठरलं तर! नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा

सिद्धरामेश्वरांच्या यात्रेबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत सहभागी होता आले. त्यामुळे माझ्या दृष्टीने आज माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. पारंपारिक बाराबंदी वेशामध्ये डोक्यावर पगडी बांधून सिद्धेश्वरांच्या यात्रेत सहभागी होणं हा एक आनंदाचा दिवस आहे'.

'सिद्धारामेश्वरांचे दर्शन घेणे ही माझ्यासाठी एक वेगळी अनुभूती होती. सिद्धरामेश्वरांकडे एवढेच मागणं मागितले की लोकांना चांगले आरोग्य आणि सुख शांती लाभो.कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच यात्रा भरतेय', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com