CBI raids Manish Sisodia Office : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारले. स्वतः सिसोदिया यांनी शनिवारी ट्विट करून हा दावा केला आहे. माझ्या ऑफिसात सीबीआयने छापेमारी केली. दुसरीकडे, सीबीआयने या छापेमारीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
दिल्लीच्या सचिवालयात मनीष सिसोदियांच्या कार्यालयात सीबीआयकडून झाडाझडती सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वतः मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट केलं आहे. माझ्या कार्यालयावर सीबीआयने छापे मारले आहेत, असे सिसोदियांनी म्हटलं आहे. (Manish Sisodia)
'आज पुन्हा सीबीआय (CBI) माझ्या कार्यालयात पोहोचलेत. त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी माझ्या घरावर छापे मारले. कार्यालयावर छापा मारला. लॉकरची झडती घेतली.
माझ्या गावातही तपास केलाय. माझ्या विरोधात काही मिळालं नाही आणि मिळणारही नाही. कारण मी काही चुकीचं केलंच नाही. प्रामाणिकपणे दिल्लीच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं आहे,' असं मनीष सिसोदियांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.