Namdeo Kumbhar
रात्री झोपताना हात अचानक सुन्न होणे किंवा हातात मुंग्या येणे ही एक सामान्य वाटणारी पण गंभीर समस्या असू शकते.
बऱ्याचदा हातावर डोके ठेवून किंवा हात दाबला जाईल अशा स्थितीत झोपल्याने रक्ताभिसरण रोखले जाते आणि हात सुन्न होतो.
मनगटातील मज्जातंतूवर (Nerves) सतत दाब पडल्यामुळे हा त्रास होतो. यामुळे हाताला मुंग्या येतात आणि पकड कमकुवत होते.
शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास मज्जातंतूच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे रात्री हात-पाय सुन्न होण्याचे प्रमाण वाढते.
रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित राहिल्यास 'डायबेटिक न्यूरोपॅथी'चा धोका असतो. यामुळे मज्जातंतू कमकुवत होऊन हात-पाय सुन्न पडतात.
मानेच्या मणक्यातील बिघाड किंवा मणक्याची नस दबल्यामुळे त्याचा थेट परिणाम हातांवर होतो आणि हात सुन्न होतात.
झोपताना हातावर पूर्ण भार टाळणे, हात सरळ ठेवणे आणि उशीची योग्य उंची वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
आहारात व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश करा, ज्यामुळे नसा मजबूत राहतील.
जर रोज रात्री हा त्रास होत असेल, हातात तीव्र वेदना किंवा कमजोरी जाणवत असेल, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मनगटाचे आणि मानेचे हलके व्यायाम (Stretching) केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हा त्रास कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती केवळ सामान्य माहिती आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांवर आधारित आहे. कोणत्याही गंभीर समस्येसाठी किंवा उपचारासाठी वैद्यकीय तज्ञांचा (Doctor) सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.