Saam Tv
घरच्या घरी ब्लँकेट स्वच्छ करण्याची आणि दुर्गंधी दूर करण्याची सोपी ट्रिक जाणून घ्या.
जर ब्लँकेट स्वच्छ असेल पण त्यातून कुबट वास येत असेल, तर १ ग्लास पाण्यात २ चमचे सुगंधित टॅल्कम पावडर आणि थोडा व्हिनेगर मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा.
ब्लँकेट पसरवून त्यावर तयार केलेला स्प्रे मारा. त्यानंतर ते काही तास कडक उन्हात वाळवून कारपेट ब्रशने हलक्या हाताने साफ करा.
ब्लँकेट धुताना पावडर डिटर्जंट वापरू नका. यामुळे जास्त फेस होतो. त्याऐवजी कोमट पाण्यात लिक्विड डिटर्जंट किंवा शैम्पू वापरा.
मोठ्या टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात लिक्विड डिटर्जंट मिसळा. यात ब्लँकेट पूर्ण बुडवून २ तास तसाच सोडून द्या.
२ तासांनंतर हलकी घासून गलिच्छ पाणी काढून टाका. सर्व फेस पूर्णपणे निघून जाईपर्यंत स्वच्छ पाण्याने ब्लँकेट धुवून घ्या.
टब उलटा करून त्यावर ३० मिनिटे ब्लँकेट ठेवून द्या. यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने उरलेले पाणी हलके पिळून घ्या.
ब्लँकेट आतून पूर्णपणे सुकेपर्यंत उन्हात वाळवा. ओलावा राहिल्यास पुन्हा दुर्गंधी येऊ शकते. अशा प्रकारे ड्राय क्लीनिंगच्या खर्चाशिवाय ब्लँकेट चमकून निघेल
NEXT : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करा 'हे' ३ देसी उपाय, नंतर कॉकरोच कधी दिसणारच नाही