Brijbhushan Singh: ठाकरेंना आव्हान देणारे बृजभूषण सिंग नरमले! पुण्यात येताच राज ठाकरेंचा उल्लेख, म्हणाले; 'तो विषय आता....'

राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेवू देणार नाही असा दमच बृजभूषण सिंग यांनी दिला होता. त्यामुळे ते पुण्यात येणार म्हणल्यावर मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Brijbhushan Singh Pune
Brijbhushan Singh PuneSaamtv

Pune: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा आमदार बृजभूषण सिंग यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरेंना अयोध्येत पाऊलही ठेवू देणार नाही असा दमच त्यांनी मनसेला दिला होता. त्यामुळे ते मनसे नेत्यांच्या चांगलेच रडारवर आले होते. मात्र आता तेच बृजभूषण सिंग पुण्यात आल्यानंतर चांगलेच नरमलेले पाहायला मिळाले.

यावेळी त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्यावादाबद्दल सावध प्रतिक्रियाही दिली आहे.

Brijbhushan Singh Pune
Kusti News : महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना या दोन व्यक्तीमध्ये होणार ; पाहा व्हिडीओ

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम विजेता आज ठरणार आहे. दोन गटातील अंतिम लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याच अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंग पुण्यात दाखल झाले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ त्यांच्या स्वागताला विमानतळावरही गेले होते.

विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ती गोष्ट आता खूप जुनी झाले आहे म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांनी नरम भूमिका घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. त्याचबरोबर "महाराष्ट्र से मुझे हमेशा प्यार मिलता आ रहा है, इसलिए मै यहाँ की जनता का आभारी हूँ," अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

Brijbhushan Singh Pune
Pune News: डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे; प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे भाषा मंत्र्यांचे आश्वासन

दरम्यान, पुण्यात आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. मॅट विभागात नांदेडचा शिवराज राक्षे तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोन पैलवानांमध्ये सामना होणार आहे. तर माती विभागात सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. (Pune News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com