Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: धक्कादायक! गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न, मांत्रिकासह ६ जणांविरोधात गुन्हा

Kolhapur Narbali News: गुप्तधन मिळवण्यासाठी कोल्हापूरमध्ये नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सरपंचामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या राधानगरी पोलिसांनी (Radhanagari Police) ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये राहणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात होता. पण याच गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी हा सर्व प्रकार उघड केला. शरद माने यांच्या घरामध्ये मोठा खड्डा खोदून त्याठिकाणी धार्मिक विधी सुरू होते. घटनास्थळावर अंगारा, हळद- कुंकू, गुलाल, लिंबू हे सर्व साहित्य देखील होते.

याप्रकरणी कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह सहा जणांच्याविरोधात कोल्हापूरच्या राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरबळी आणि जादूटोणा कायद्यान्वये या सहाही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT