Kolhapur Market Committee Election saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News: मतपत्रिकेसोबत निघाल्या ५०० च्या नोटा! उमेदवाराने वाटलेले पैसे मतदाराने केले परत, पाहा Video

Kolhapur Bazar Samiti Nivadnuk Matmojani : कोल्हापूरमध्ये आज मतमोजणी करताना कर्मचाऱ्यांना एक पाकिट आढळून आले. यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळल्या.

Chandrakant Jagtap

>>रणजीत माजगावकर

Kolhapur Market Committee Election : आजकाल निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटल्याचे अनेक प्रकार समोर येताता. मात्र हे दिलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीत टाकून परत केल्याची प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे. मतदारांना विकत घेण्याचा केलेला प्रयत्न या स्वाभिमानी मतदाराने हाणून पाडलाय. कोल्हापूरमध्ये आज मतमोजणी करताना कर्मचाऱ्यांना एक पाकिट आढळून आले. यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळल्या. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर चांगलीच चर्चा रंगली.

कोल्हापूरमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणी दरम्यान कोल्हापूरकरांचा मूडच एकप्रकारे समोर आला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराने वाटलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीतून निवडणूक आयोगाला परत केले आहे. मतमोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांना मतपत्रिकेसोबत दोन पाचशेच्या नोटा आढळून आल्या. हे पैसे निवडणूक आयोगाला जमा करावे अशी विनंती या मतदाराने केली आहे.

चिठ्ठ्या लिहून उमेदवारांना कानपिचक्या

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी चांगलीच रंगतदार होत चालली आहे. आधी एक मतपत्रिकोसोबत दोन पाचशेच्या नोटा आढळल्यानंतर आता काही मतपत्रिकांमध्ये चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून मतदारांनी निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांना चांगल्याच कानपिचक्या आणि सल्ले दिले आहेत.

महाविकास आघाडीची विजयी आघाडी

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 7 जागांचे निकाल हाती आले आहेत. यात महाविकास आघाडीला 5 जागा मिळाल्या असून अपक्ष आणि विरोधी पक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. उर्वरित सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

त्यामुळे मविआच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत गुलाल लावत जल्लोष केला.

कोल्हापूर बाजार समितीची 1800 कोटींची उलाढाल

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान झाले आहे. एकूण 4 मतदार संघ गट असून 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. दोन्ही गटाचे 36 उमेदवार आणि अपक्ष 14 उमेदवार आहेत. कोल्हापूर बाजार समितीची 1800 कोटी रुपयांची उलाढाल आहे. (Kolhapur News)

बाजार समितीवर गेल्या 5 वर्षांपासून राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य इतर पक्ष- समरजितसिंह घाटगे गट, शेकाप गटांचं वर्चस्व होतं. यंदाच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध शिवशाहू परिवर्तन आघाडी यांच्यात लढत होत आहे. आज कोल्हापुरातील रमणमाळ इथल्या शासकीय गोदाम परिसरात या निवडणुकीसाठीची मतमोजणी पार पडत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT